Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • धनत्रयोदशीपूर्वी शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 271 अंकांनी वाढला तर निफ्टी 25,400 च्या वर
बिजनेस

धनत्रयोदशीपूर्वी शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 271 अंकांनी वाढला तर निफ्टी 25,400 च्या वर

मुंबई : गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार उत्साही राहिला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सुरुवातीच्या काळात जोरदार सुरुवात केली. सकाळी 9:16 वाजता, बीएसई सेन्सेक्स 271.74 अंकांनी वाढून 82,877.17 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 78.4 अंकांनी वाढून 25401.95 वर व्यवहार करत होता. निफ्टीमध्ये अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, मॅक्स हेल्थकेअर, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्स हे सर्वात जास्त वाढलं, तर श्रीराम फायनान्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, ओएनजीसी, टेक महिंद्रा आणि टीसीएसमध्ये घसरण झाली.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात :

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.5% वाढलं. उल्लेखनीय म्हणजे, सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते, जे व्यापक बाजारपेठेतील सकारात्मक कल दर्शवते. सुमारे 1,433 समभाग वाढले, 774 घसरले आणि 140 अपरिवर्तित राहिले.

निकालांचा परिणाम आणि आजच्या प्रमुख घोषणा :

आज कॉर्पोरेट तिमाही निकालांना बाजारात गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद दिसून येत आहे. खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. इन्फोसिस आणि विप्रो या दोन प्रमुख आयटी कंपन्या आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत, ज्याचा परिणाम संपूर्ण आयटी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांव्यतिरिक्त, इटरनल, इंडियन बँक, नेस्ले इंडिया, एलटीआय माइंडट्री, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, मेट्रो ब्रँड्स, वारी एनर्जीज आणि विक्रम सोलर यासारख्या अनेक महत्त्वाच्या कंपन्या देखील आज त्यांचं आर्थिक निकाल जाहीर करतील. गुंतवणूकदारांसाठी हा दिवस उत्साहपूर्ण असण्याची अपेक्षा आहे.

आशियाई शेअर बाजारातील आजचा ट्रेंड :

वॉल स्ट्रीटवरील तेजीचा मागोवा घेत गुरुवारी बहुतेक आशियाई शेअर निर्देशांक वाढलं, जिथं अस्थिर व्यापार दिवसानंतर बाजार पुन्हा उसळला. यूएस फ्युचर्स जवळजवळ स्थिर होतं, तर तेलाच्या किमती वाढल्या. पीटीआयनं वृत्त दिलं आहे की, जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.8% वाढून 48,069.71 वर बंद झाला कारण गुंतवणूकदारांच्या भावनांना उत्पन्न हंगामाच्या मजबूत सुरुवातीमुळं आणि यूएस व्याजदर कपातीच्या अपेक्षेनं पाठिंबा मिळाला होता.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts