आचार्य चाणक्य यांच्या नुसार, ज्या घरात महिला नियमांचे पालन करून राहतात,त्या ठिकाणी दारिद्र्य कधीच येत नाही. लग्न करत असताना जिवनसाथी ची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु जीवनसाथी अयोग्य निघाल्यास आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न करत असताना विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य बरबाद होऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक मुलाने जीवनसाथी निवडताना मुलींमध्ये या गोष्टी बघायला हव्यात. त्याशिवाय चुकीच्या मुलीसोबत लग्न करणे महागात पडू शकते.
धर्म कर्म न मानणारी मुलगी
आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या मुलीचा धर्म कर्म यावर विश्वास नाही त्या मुली सोबत लग्न करणे अयोग्य आहे. ज्या मुलींना आपल्या धर्म आणि कर्म याचं ज्ञान प्राप्त नसते त्या मुली घराघरात फूट पाडतात.
दुसऱ्यांच्या मर्जीने लग्न करणारी मुलगी
जी मुलगी प्रेशर मध्ये येऊन आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलासोबत प्रेशर मध्ये लग्न करते अशा मुलीकडून घर आणि नाते सांभाळण्याची उमेद ठेवणं चुकीचं आहे. अशी मुलगी कधीच कोणाला सन्मान देऊ शकत नाही.
रागीट स्वभावाची मुलगी
आचार्य चाणक्य म्हणतात की जी मुलगी चिडचिडी, रागीट स्वभावाची आहे या मुली सोबत लग्न केल्यास घरात कलह निर्माण होतो. त्यामुळे अशी मुलगी निवडा किती शांत स्वभावाची असेल.
वरयेत कुलजा विरूपामपि कन्यकाम
रुपवतीं न निचस्य विवाह : सद्यशे कुले
आचार्य चाणक्य यांच्या मते बुद्धिमान व्यक्तीला खालच्या कुळातील सुंदर मुलीशी लग्न न करता श्रेष्ठ कुळातील, कुरूप म्हणजेच सौंदर्यहीन मुली सोबतच लग्न करायला पाहिजे. बऱ्याचदा लग्न करण्यासाठी सुंदर मुलीची निवड केल्या जाते. परंतु तिच्या गुणांना बघितल्या जात नाही. अशा मुलींसोबत लग्न करणं कधीही दुखदायी असू शकतं.
हे हि वाचा : चाणक्य नीति : यश मिळवण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे, समजून घ्या चाणक्य नीति चे सिद्धांत
विषादप्यमृत ग्राह्यममेधयादपि कात्रचनम
नीचादप्युत्तमा विद्या स्त्रीरत्न दुष्कुलादपि
या श्लोकानुसार, जर देशात अमृत असेल तर ते ग्रहण केलं पाहिजे. अपवित्र किंवा अशुद्ध वस्तूंमध्ये सोनं असेल किंवा मौल्यवान वस्तू असेल तर घेणं योग्य असतं. त्याचप्रमाणे जर एखाद्या खालच्या मनुष्याकडे चांगली विद्या, कला, गुण असतील तर ते स्वीकारणं चांगलं आहे. यानुसार चांगल्या गुणांनी संस्कार असलेल्या मुलीसोबत लग्न करणं चांगलं आहे.