Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Diwali Special Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat: जाणून घ्या लक्ष्मीपुजनाचा शुभ मुहूर्त; अशा पद्धतीने करा पूजा
धार्मिक

Diwali Special Lakshmi Puja 2025 Shubh Muhurat: जाणून घ्या लक्ष्मीपुजनाचा शुभ मुहूर्त; अशा पद्धतीने करा पूजा

दिवाळी हा ऐक्य, शांती, उत्साह, प्रत्येकाच्या आयुष्यात उत्साह निर्माण करणारा हा सण आहे. हा सण माता महालक्ष्मी आणि श्री गणेश देवतेची कृपा मिळवण्यासाठी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यंदा माता लक्ष्मीची पूजा करण्याचा मुहूर्त कधी आहे याबाबत लोकांमध्ये गोंधळ उडत आहे. तर जाणून घेऊया यंदाची लक्ष्मी पूजनाची तिथी आणि मुहूर्त.

आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यंदा आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 03:44 वाजल्यापासून असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 05:54 वाजेपर्यंत समाप्त होणार आहे. त्यामुळे काही ज्योतिषीच्या म्हणण्यानुसार 20 ऑक्टोबर तर काहीनुसार 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. तर बरेच जण दोन्ही दिवशीही लक्ष्मी पूजन करणार आहे.

लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त 20 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे.
प्रदोष काळ संध्याकाळी 6.12 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेपर्यंत आहे.
वृषभ काळ संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 9.41 वाजेपर्यंत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lok Shevay (@lokshevay)

माता लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य :

लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी चौरंग किंवा पाट, नवे वस्त्र, केरसुणी, लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा फोटो, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, फराळाचा नैवेद्य, सुक्या खोबऱ्याच्या दोन वाट्या, खडीसाखर, बत्ताशे, साळीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धणे, फळे, लक्ष्मीमातेची मूर्ती, श्री गणेशाची मूर्ती, सुटी नाणी, शंख, घंटा, आंब्याच्या डहाळ्या, कलश, पंचामृत या सामग्री महत्वपूर्ण आहेत.

अशी करा पूजा

देव्हाऱ्यासमोर दोन ते तीन मोठे पाट किंवा चौरंग ठेवावे. या चौरंगावर पूजेसाठी आणलेले नवे वस्त्र अंथरावे.  या चौरंगावर स्वस्तिक काढावे, स्वस्तिकावर नवी केरसुणी ठेवावी. आणि त्याची पूजा करावी, कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये नाणी आणि सुपारी टाकावी, आणि हळदी कुकू वाहून आंब्याची पाने कलश च्या चहुबाजूनी ठेऊन श्रीफळ ठेवावे. तद्पुर्वी चौरंगावर तांदूळ घेऊन ते पसरवावे. त्यावर स्वस्तिक काढावे. त्यानंतर कलश स्थापित करावा. पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी, त्यासमोर दोन स्वतंत्र विड्याच्या पानावर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवावे.

पूजेसमोर नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ, सुक्या खोबऱ्याच्या एका वाटीमध्ये खडीसाखर, दुसऱ्या वाटीमध्ये बत्ताशे, साळीच्या लाह्या, पुरणाचा नैवेद्य, नारळ, गूळ, धणे, फळे इत्यादी गोष्टी मांडावे , माता लक्ष्मी-नारायणच्या फोटो किंवा मूर्तीशेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा. त्याच्यासमोरील बाजूस चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे, त्यासमोर पैसे, सोने, चांदी, इत्यादी गोष्टी मांडावे, पूजेच्या समोर मधोमध आपल्या देवघरातील श्री गणेशांची मूर्ती, स्वतःच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी. सर्व गोष्टींना हळद-कुंकू अक्षदा फुले अर्पण करावे, निरांजन ओवाळावे. पूजा मांडणी करुन झाल्यानं विधीवत पूजा-आरती-प्रार्थना करावी, प्रसादाचे वाटप करावा.  दुसऱ्या दिवशी पूजेचे उद्यापन करावे आणि पूजा साहित्य निर्माल्य प्रवाहित करावे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts