Ranji Trophy record broken : आसाम आणि सर्व्हिसेस संघातील रणजी ट्रॉफीचा सामना इतिहासात नोंदवला गेला आहे. कारण हा भारताच्या प्रमुख रेड-बॉल क्रिकेट स्पर्धेतील सर्वात कमी कालावधीचा सामना ठरला. चार दिवस चालणारा हा सामना फक्त 90 षटकांत संपला, सामन्यात सर्व्हिसेसनं आसामला 8 विकेट्सनं हरवून हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला.
540 चेंडूत संपला सामना :
या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त 90 षटकांत म्हणजेच 540 चेंडूत संपला, यासह रणजी ट्रॉफी इतिहासातील सर्वात कमी कालावधीचा सामना ठरला. सर्व्हिसेसनं 8 विकेट्सनं हा सामना जिंकला. सामन्याच्या सुरुवातीला, आसाम पहिल्या डावात फक्त 103 धावांवर 17.2 षटकांत ऑलआउट झाला. सर्व्हिसेसचा गोलंदाज अर्जुन शर्मानं 46 धावांत 5 विकेट्स घेतल्या आणि मोहित जांगरानं 5 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
एका डावात दोन गोलंदाजांची हॅटट्रिक (Ranji Trophy record broken)
विशेष म्हणजे या सामन्याच्या एका डावात दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली. प्रथम श्रेणी सामन्याच्या एकाच डावात दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक घेण्याची ही पहिलीच वेळ होती. आसाम दुसऱ्या डावात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला. रियान परागच्या शानदार कामगिरीमुळं सर्व्हिसेसनं फक्त 108 धावा केल्या आणि नाममात्र 5 धावांची आघाडी घेतली. राजस्थान रॉयल्सचा स्टार रियान परागनं कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करत दुसऱ्यांदा पाच बळी घेतले. राहुल सिंगनंही त्याला चांगली साथ दिली आणि 4 बळी घेतले.
🚨 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐀𝐥𝐞𝐫𝐭 🚨
Services and Assam played out the 𝘀𝗵𝗼𝗿𝘁𝗲𝘀𝘁-𝗲𝘃𝗲𝗿 𝗰𝗼𝗺𝗽𝗹𝗲𝘁𝗲𝗱 𝗥𝗮𝗻𝗷𝗶 𝗧𝗿𝗼𝗽𝗵𝘆 𝗺𝗮𝘁𝗰𝗵! (in terms of balls bowled) ‼
Just 90 overs (540 balls) were bowled to decide the result in Tinsukia, breaking a 63-year-old record… pic.twitter.com/SOHxfvSV8I
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 27, 2025
75 धावांवर संघ तंबूत :
मात्र आसाम दुसऱ्या डावात 29.3 षटकांत फक्त 75 धावांवर ऑल आऊट झाला. चार फलंदाज धावा न करता बाद झाले. फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. यानंतर 71 धावांचं माफक लक्ष्य समोर असताना, सर्व्हिसेसनं फक्त 13.5 षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. या दोन्ही विकेट रियान परागने घेतल्या.
हे हि वाचा : धक्कादायक! सामन्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियनं क्रिकेटपटूंचा विकृताकडून विनयभंग
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात लहान मॅच :
संपूर्ण सामना फक्त 90 षटकांत किंवा 540 चेंडूत संपला. पहिल्या दिवशी 25 विकेट पडल्या, तर उर्वरित सात दुसऱ्या दिवशी सकाळी पडल्या. यामुळं रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील खेळलेल्या चेंडूंच्या बाबतीत हा सर्वात लहान सामना ठरला. यापूर्वी, हा विक्रम 1962 मध्ये दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामन्याच्या नावावर होता, ज्यामध्ये 547 चेंडू लागले. तो सामनाही दोन दिवसांत संपला, ज्यामध्ये दिल्लीनं एक डाव आणि 53 धावांनी विजय मिळवला होता.












