Vadwani woman doctor suicide case : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कठोर कारवाई आणि उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बीड ते परळी मार्गावर वडवणीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. वडवणी शहरासह परिसरातील नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पीडित डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तहसीलदारांना निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशी करून फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.












