ITR filing deadline extended : ITR करदात्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता आयकर विभागाने कर दात्यांसाठी आरटीआय फाईल करण्याची मुदत वाढवून दिली असून नवीन तारखेचा देखील खुलासा करण्यात आला आहे. याबाबत उद्योग जगतातील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र सोबतच उत्तर भारतामध्ये पावसाने प्रचंड थैमान घातले असून राज्यावर आलेले नैसर्गिक संकट पाहता आयकर विभागाने कर दात्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आता 2025 26 या कर निर्धारण वर्षासाठी करदात्याना कर भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी आयकर खात्याने 25 सप्टेंबर रोजी ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून 31 ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. याबाबत आयकर खात्याने बुधवारी निर्णय घेतला असून कंपन्या आणि ऑडिट करण्याची गरज असलेल्या कर दात्यांना दिलासा मिळणार आहे. त्यानुसार तुम्ही आयकर रिटर्न फाईल आता 10 डिसेंबर पर्यंत भरू शकतात. यापूर्वी हि इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर होती. (ITR filing deadline extended)
प्रशासकीय शिखर परिषद केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत माहिती दिली. त्या अनुषंगाने निर्धारण वर्ष 2025 26 साठी इन्कम टॅक्स दाखल करण्याची यापूर्वीची तारीख 31 ऑक्टोबर होती. ती आता दहा डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. तर ऑडिट रिपोर्ट जमा करण्याचीही अंतिम तारीख 10 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे. आयकर च्या अधिनियमानुसार ऑडिट ची गरज असणाऱ्या कंपन्या फॉर्म आणि प्रोप्रायटर शिप युनिट्सला 31 ऑक्टोबर पर्यंत रिटर्न दाखल करावा लागतो. परंतु यंदा राज्यावर ओढावलेले नैसर्गिक संकट पाहता या तारखेत बदल करण्यात आला.
मुदतवाढ मिळावी यासाठी उद्योग क्षेत्रातून मोठी मागणी करण्यात येत होती. कारण राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकट आल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे आयकर विभागाने उद्योग क्षेत्रातील मोठ्या मागणीला मान देऊन तारीख बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
आतापर्यंत 7.54 कोटींपेक्षा जास्त रिटर्न दाखल करण्यात आला असून 1.28 कोटी करता त्यांनी स्वतः मूल्यांकन कराचा भरणा केला आहे. (ITR filing deadline extended)







