Yogita Chavan Saurabh Choughule breakup : जीव माझा गुंतला या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीच्या झोपतात आलेले कलाकार योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे दोघेही विभक्त होण्याची चर्चा जोरदार रंगली आहे. 2014 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती परंतु आता त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे सोशल मीडियावर चर्चा आहे.
योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांचे वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी समोर येत आहे. यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याची शक्यता समाज माध्यमांवर व्यक्त केली जात आहे. त्यांनी काही महिन्यांपासून एकत्र कोणताही फोटोज किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नसल्यामुळे या चर्चांना उधाण आल्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच दिवाळी हा सण प्रत्येक कलावंताने आनंदात साजरा केला. समाज माध्यमावर बऱ्याच अभिनेत्यांनी दिवाळी साजरी करतानाचे फोटोज समाज माध्यमावर टाकले होते. तर आज काल सर्वजण समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, खास करून सेलिब्रिटी यांची समाज माध्यमांवर पोस्ट करणे कायम सुरू असते. परंतु यंदाच्या दिवाळी सणानिमित्त देखील एकमेकांचे फोटो शेअर करण्यात आलेले नाहीत. तर त्यांनी दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाउंट वरून डिलीट केलेले आढळले. यासह दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलेले दिसले. Yogita Chavan Saurabh Choughule breakup
काही महिन्यांपासून ते एकत्र राहत नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे योगिता चव्हाण आणि सौरभ विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असून या चर्चांवर अद्यापही दोन्ही जोडप्यांनी याबाबत अधिकृत विधान केलेले नाही.












