Tongue Shape Future Prediction : शास्त्रात ज्याप्रमाणे हस्तरेखा पाहून मानवाचे जीवन, स्वभाव आणि भविष्याबद्दल ओळखलं जातं त्याचप्रमाणे तुमची जीभ देखील तुमचं भविष्य ठरवू शकते. एवढेच नाही इतर हस्तरेषेप्रमाणे आपल्या शरीराच्या विविध भागांची रचना पाहून देखील जातकाचे जीवन आणि त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखता येते.
प्रत्येकाच्या हातावरील रेषा वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे जिभेचा रंग, पोत, आकार, शरीराची रचना हे सर्व भिन्न असतात. हस्तरेषेनुसार प्रत्येकाच्या आयुष्यातील चढ उतार, चांगल्या वाईट गोष्टी ओळखता येतात. तर जिभेचा पोत आणि रंग या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाबद्दल आणि स्वभावाबद्दल ओळखू शकतो. ते कसं हे आज आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
जिभेचा नाकाला स्पर्श
शास्त्रानुसार ज्या लोकांची जीभ नाकाला स्पर्श करते ते व्यक्ती नशीबवान आणि खूप आनंदी असतात. अशी जीभ असलेल्या लोकांना नेहमीच नशीबवान म्हटलं जातं. ते त्यांच्या आयुष्यात मोठे यश मिळवू शकतात. ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आनंद शोधू शकतात.
लाल आणि पातळ जीभ
ज्या लोकांची जीभ ही लाल पातळ आणि अतिशय मऊ असते ते खूप ज्ञानी असतात. अशा व्यक्तींना अभ्यासात प्रचंड रस असतो. त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवणे आवडते. यासोबतच आपली बुद्धिमत्ता हुशारी यांच्या जोरावर ते आपल्या कार्यक्षेत्रात देखील यश मिळवल्याशिवाय राहत नाही. एवढेच नाही तर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ते हतबल न होता अत्यंत हुशारीने बाहेर पडतात. लाल आणि पातळ जीभ असलेले लोक अत्यंत धार्मिक आणि देवाचे खरे भक्त बनू शकतात.
अशी जीभ असलेल्या मुलीही असतात आनंदी
सहसा मुलींची जीभ ही मऊ लाल आणि पातळ असते. त्यामुळे त्यांना नशीबवान मानले जाते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीतुन ते आनंद मिळवतात. त्यांना प्रत्येक आनंद मिळतो. त्यांचे लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे जीवन नेहमीच आनंदी आणि शांत राहते. अशा मुली त्यांच्या करिअरमध्ये देखील मेहनत आणि नशिबाने चांगले स्थान मिळवतात आणि आळंदी आयुष्य जगतात. लाल रंगाची जीभ असलेल्या मुलींना उत्तम जीवनसाथी मिळतो. या मुली कधीही कशाचीही कमतरता भासू देत नाही. आणि त्यांना देखील कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही खास करून पैशांची कमतरता.
जाड जीभ असलेल्या मुली
ज्या मुलींची जीभ ही जाड असते त्यांच्या आयुष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शास्त्रानुसार त्यांना अकाली काही त्रास देखील सहन करावा लागू शकतो. अशा मुलींच्या आयुष्यात सतत अडचणी येतात. त्यांना या अडचणींचा सामना करावा लागतो.
टोकदार जीभ (Tongue Shape Future Prediction)
ज्या व्यक्तींच्या जिभेचा पुढचा भाग हा टोकदार असतो आणि जीभ लांब असते अशा व्यक्तीला भाग्यवान मानले जाते. अशा व्यक्तींना फार कमी दुःखाचा सामना करावा लागतो. आयुष्यात सर्व प्रकारचा आनंद आणि वैभव त्यांना मिळते. त्यांच्या आयुष्यात पूर्ण सुख-समृद्धी लाभते. एवढेच नाही त्यांच्या करिअरमध्ये ते खूप मोठी उंची गाठतात आणि भरपूर पैसे कमवण्यास सक्षम असतात. यामुळे टोकदार जीभ आणि उंच जीभ असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात पैशांच्या समस्या खूप क्वचितच येतात.







