PM Crop Insurance : परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. निसर्ग शेतकर्यांवर कोपला असताना सरकार मायबापाने पण त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे. पोटच्या लेकरासारखी जपलेल पिडोळ्यादेखत वाहून गेलं. होत्याचं नव्हतं झालं. शेतकर्यांचे अश्रु हे मगरीप्रमाणे असतात ते कधीच कोणाला दिसत नाहीत, असल्याचा प्रकार घडला आहे. पालघर जिल्ह्यातील एका शेतकर्याची सरकारनं विमा योजनेच्या नावाखाली थट्टाच केल्याचे समोर आलं आहे. ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना” अंतर्गत या शेतकऱ्याला नुकसान भरशेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम, PM पीक विमा योजनेतून २.३० रूपयांचे अनुदान
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. निसर्ग शेतकर्यांवर कोपला असताना सरकार मायबापाने पण त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे. पोटच्या लेकरासारखी जपलेल पिक डोळ्यादेखत वाहून गेलं. होत्याचं नव्हतं झालं. शेतकर्यांचे अश्रु हे मगरीप्रमाणे असतात ते कधीच कोणाला दिसत नाहीत, असल्याचा प्रकार घडला आहे. पालघर जिल्ह्यातील एका शेतकर्याची सरकारनं विमा योजनेच्या नावाखाली थट्टाच केल्याचे समोर आलं आहे. ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना” अंतर्गत या शेतकऱ्याला नुकसान भरपाई पोटी अवघी २ रुपये ३० पैशांची मदत मिळाली आहे. सरकारचं हे कृत्य म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
हेही वाचा – “मराठी आई मेली तरी चालेल पण, उत्तर भारतीय मावशी जगली पाहिजे;” शिंदेच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
चक्क २ रुपये ३० पैशांची भरपाई
वाडा तालुक्यातील शिलोत्तर गावामधील मधुकर बाबूराव पाटील असे या नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी पीक विमा काढला आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान भातलागवडीच्या वेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले. राज्य सरकारकडून त्यांना सुमारे एक हजार रुपयांची भरपाई देण्यात आली. मात्र, पिकांचे नुकसान त्याहून अधिक असल्याचं शेतकर्याच म्हणण आहे. त्यातच ‘प्रधानमंत्री फसल विमा योजनें’तर्गत तर चक्क २ रुपये ३० पैशांची भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा लावली असल्याचे बोललं जात आहे.
भातशेती उद्ध्वस्त
पिके कापणीला आल्यावर पावसाचा कहर सुरू झाला. यामुळे वाडा तालुक्यातील संपूर्ण भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. त्याच सरकारकडूनही भरपाईच्या नावाने अशी थट्टा केली जात असेल, तर शेतकऱ्याने कुणाच्या आशेवर जगायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्ष व शेतकरी संघटनांनी तातडीने भरपाई मिळावी, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहेत.
आत्मविश्वासानं सांगतो ते खोटे आहेत..
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सरकाराला इतक्या आत्मविश्वासानं ते खोटे आहेत असं का म्हणत आहे? कारण महाराष्ट्रात, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना ₹२.३० भरपाई देण्यात आली, असं काँग्रेसचे प्रवक्त्ये अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
मैं इतने दावे से इन्हें झूठा क्यों कह रहा हूं
क्योंकि महाराष्ट्र में प्रधानमंत्री फसल बीमा में
किसान को ₹2.30 पैसे मुआवजा दिया गया है pic.twitter.com/mG60vGd580— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) November 3, 2025












