पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाची भेट घेतली. पंतप्रधानांनी खेळाडूंना त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आणि स्पर्धेत सलग तीन पराभवांनंतर संघाच्या उल्लेखनीय पुनरागमनाचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच टीम इंडियाच्या विजयाबद्दल सोशल मीडियावरुन अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. मैदानावर भारतीय संघाच्या पोरींनी दाखवलेल्या धाडसी आणि शानदार खेळीचं बुधवारी पुन्हा एकदा कौतुक केलं.
हेही वाचा – ICC Women’s Cricket World Cup : एकदिवशीय विश्वविजेता भारतीय महिला संघाची पंतप्रधान मोदी उद्या घेणार भेट
हरमनप्रीत कौरचा आठवणींना उजाळा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “संघानं केवळ मैदानावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हृदयात स्थान मिळवलं आहे.” कर्णधार हरमनप्रीत कौरनं 2017 मध्ये पंतप्रधानांना भेटल्याची आठवण सांगितली, परंतु त्यावेळी ट्रॉफी नसल्याचं ती म्हणाली. “आता आमच्याकडे ट्रॉफी देखील आली आहे. आम्हाला पंतप्रधानांना पुन्हा पुन्हा भेटायला आवडेल,” हरमनप्रीत हसत म्हणाली.
The victorious Indian Cricket Team met the Honourable Prime Minister of India, Shri Narendra Modiji, at his official residence.
We extend our heartfelt gratitude to the Honourable Prime Minister for his words of encouragement and support that continues to inspire #TeamIndia… pic.twitter.com/8vcO4VgPf6
— BCCI Women (@BCCIWomen) November 6, 2025
पंतप्रधान मोदींचं योगदान महत्त्वाचं :
संघाची उपकर्स्मृणधार ती मानधना म्हणाली, पंतप्रधानांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा दिली आहे. आज मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत आणि यामध्ये पंतप्रधान मोदींचं योगदान महत्त्वाचं आहे.” दीप्ती शर्मा म्हणाली की, मी बऱ्याच काळापासून पंतप्रधान मोदींना भेटण्याची वाट पाहत होती. 2017 मध्ये पंतप्रधानांनी आम्हाला कठोर परिश्रम करत राहण्यास सांगितलं होतं. आज ते स्वप्न वास्तवात उतरले आहे.”
PHOTO | Prime Minister Narendra Modi (@narendramodi) today hosted the champions of Women’s World Cup at his residence at Lok Kalyan Marg today.
PM congratulated the team for the victory and praised their remarkable comeback in the tournament after a string of three defeats and… pic.twitter.com/yZido2VEpq
— Press Trust of India (@PTI_News) November 5, 2025
तंदुरुस्त राहणं महत्त्वाचं :
या विशेष बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंना, विशेषतः देशभरातील मुलींमध्ये, ‘फिट इंडिया’ चळवळीला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. त्यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, “यशस्वी होण्याइतकेच तंदुरुस्त राहणं देखील महत्त्वाचं आहे.”









