Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी, वाहतूक कोंडीत प्रवाशी अडकले, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले
Top News

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी, वाहतूक कोंडीत प्रवाशी अडकले, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

A gas tanker overturned on the expressway

A gas tanker overturned on the expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) ज्वनशील रसायन घेऊन जाणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी उलटा, (Gas tanker overturned) त्यामुळे तब्बल ३२ तास हा महामार्ग ठप्प (Highway blocked for 32 hours) होता. यामुळे अनेक वाहनं अडकून पडली. कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा (Queues of vehicles stretching up to 25 kilometers) लागल्या होत्या, त्यातल प्रवाशांचेही मोठे हाल (Passengers also face great hardships) झाले. यामुळे मोठा गदारोळ झाला. अंधारलेले रस्ते, अनेक तास न हलणारी वाहन, रडणारी मुलं, खाणं तर सोडा, पण प्यायला पाणीही न मिळाल्याने प्रवाशांचे झालेले हाल यामुळे लोकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सरकार सुनावलं आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत टीका केली आहे. अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीत टीकास्त्र सोडलं आहे. ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून, पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य उघड

राज ठाकरे यांनी ‘एक्स’ अकाउंटवर काय म्हटलंय?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.

मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा

परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.

पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार नागरिकांना निराधार वाटावं का?

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्मान सेनेते अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

पर्यायी मार्ग

ताम्हिणी घाट मार्ग : चांदणी चौक → ताम्हिणी घाट→ रायगड

माळशेज घाट मार्ग : पुणे → चाकण → नारायणगाव → आळे फाटा → माळशेज घाट → मुरबाड → कल्याण/ ठाणे → मुंबई

भीमाशंकर / मंचर मार्ग : पुणे → मंचर → जुन्नर → माळशेज परिसर → मुंबई

या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना करण्यात आले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts