Back to Hinduism : नाशिक जिल्ह्यातील २५५ कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. त्यामुळे आजपर्यंत एकूण १ लाख ५४ हजार ५९१ बांधवांनी हिंदू धर्मातून प्रवेश केला आहे. याप्रसंगी नाशिक येथील अनेक साधू -महंत उपस्थित होते. अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी जगतगुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांचा प्रवचन दर्शन व मार्गदर्शन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा – युगेंद्र पवार यांची सोशल मिडियावर भावनिक पोस्ट, “काका आज तुम्हाला एक महिना झाला…”
परकीय व परधर्मीय धर्म प्रचारकांनी भुलथापा देऊन व अमिषे दाखवून या कुटुंबांना अन्य धर्म स्वीकारणे भाग पडले होते. आता त्यांना या गोष्टीचा पश्चाताप झाला होता. जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून त्यांनी पुन्हा विधीवत हिंदू धर्मात प्रवेश केला.
या सोहळ्यापूर्वी जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांची पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चर्चा केली. त्यावेळी त्यांनी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.ते म्हणाले, ” आता या कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील.”
या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ” बाल संस्कार केंद्रात पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या संस्कारासाठी घेऊन जावे मुलांना आपल्या हिंदू धर्माचे संस्कार दिले पाहिजे, शाळा कॉलेजमध्ये देखील संस्कार शिकवले पाहिजे जसे इतर धर्म मुलांना स्वतःबरोबर धार्मिक स्थळी घेऊन जातात, तसेच हिंदू धर्माच्या मुलांना देखील पालकांनी आपल्या सोबत मंदिरात घेऊन गेले पाहिजे. अन्य धर्मीय मुलांवर संस्कार करतात.
हिंदू धर्मातील पालकांनीही मुलांना घरी – दारी धार्मिक शिक्षण द्यावे. धर्माचे शिक्षण हे असलच पाहिजे, तरच धर्म टिकणार आहे.आज हिंदू धर्माबरोबरच कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ नये असे माझे मत आहे.” यावेळी समस्या मार्गदर्शन सोहळाही झाला.








