जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी 26 जानेवारी रोजी 9 वाजता गणतंत्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस उपाधीक्षक संदीप गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत जिल्ह्याच्या कामांचा आढावा सांगितला. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या विविध विभागातील पथकाने मानवंदना देऊन पतसंलन करण्यात आले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाभरातील अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली.












