मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहेत. पहाटे 5 वाजता त्यांनी मुंबईत प्रवेश केला असून CSMT ला भगवा महासागर पाहायला मिळाला. मात्र आंदोलनस्थळी म्हणजे आझाद मैदानावर समर्थक पोहोचले असून मोठी गर्दी झाली आहे. आता सरकारची भूमिका काय असणार? जरांगे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.