‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वातानुकूलित शौचालय उभारण्यात येणार असून यासाठी 87 लाख रूपये खर्चाचे असे पुण्यात ४ कोटी ३१ लाख निधीचे पाच शौचालये उभारली जाणार आहेत. डिजिटल पेमेंट, पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र जागा, दिव्यांगांसाठी विशेष सोय, सुविधांमध्ये आंघोळीसाठी आणि कपडे बदलण्याच्या जागा सुद्धा असणार आहे.