छत्रपती संभाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात हर्सूल कारागृहातील आरोपी अजय ठाकूरने पोलीस अंमलदाराच्या छातीत लाथ मारून शिवीगाळ केली. अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात तुरुंगात असलेला आरोपी न्यायालयात नातेवाईकांना भेट देण्याच्या वादातून संतापला. घटनेनंतर पोलिसांनी अजय ठाकूरला ताब्यात घेऊन वेदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.