नांदेड शहरात पोलीस आणि आरोपीमध्ये रात्रीच्या सुमारास एक थरारक प्रकार घडलाय. ज्यामध्ये आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखलीय. परिणामी पोलिसांनी ही गोळीबार केला, मात्र यात आरोपी पसार झालाय. नांदेड शहरातील कौठा भागात हा थरार घडला.