बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेडजवळ अमरावतीचा एमपीएससी विद्यार्थी अमोल इसाळ याच्यावर ऍसिड हल्ला झाला. अज्ञातांनी त्याला शेतात ओढून मारहाण केली, लुटले आणि चेहऱ्यावर ऍसिड फेकले. गंभीर जखमी अवस्थेत अमोल कसाबसा मुख्य रस्त्यावर आला, नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी त्याला यवतमाळला हलवण्यात आले आहे. या प्रकरणात अमोलच्या रूम पार्टनरसह वादाची माहिती समोर आली असून, पोलिस तपास सुरू आहे.