बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावासाठी रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार तब्बल 31 तासांनंतर मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर नदीपात्रातून सापडला असून शासनाच्या निष्क्रियतेमुळे हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.