Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाड्यात भीषण दुष्काळ! माणसांसोबत मुक्या प्राणी-पक्ष्यांचंही जगणं कठीण
ऍग्रो स्पेशल

मराठवाड्यात भीषण दुष्काळ! माणसांसोबत मुक्या प्राणी-पक्ष्यांचंही जगणं कठीण

Marathwada Drought
45

Marathwada Drought : मराठवाड्यात सध्या 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळ पाहायला मिळत आहे…जिकडे पाहावं तिकडे उजाड माळरान… सुकलेलं गवत… पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या जमिनी… आटलेल्या विहिरी आणि त्यातच अंगाची लाहीलाही करणारं कडक ऊन… या परिस्थितीत माणसांबरोबरच मुक्या प्राणी-पक्ष्यांच्या जगण्याचाही प्रश्न निर्माण झालाय… कारण मराठवाड्यातील अनेक भागांत दाट जंगल नाही… मोठ्या प्रमाणावर मोकळी शेती आणि माळरानं आहेत… त्यामुळे प्राणी-पक्ष्यांना उन्हापासून वाचण्यासाठी पुरेशी सावलीही मिळत नाही… एकीकडे प्यायला पाणी नाही, दुसरीकडे खायला अन्न नाही आणि तिसरीकडे उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडांचा आसराही नाही… अशा तिहेरी संकटात मराठवाड्यातील मुक्या जीवांचं अस्तित्व धोक्यात आले आहे…काही ठिकाणी प्राणी-पक्षी पाण्याअभावी मृत पावताना दिसत आहे…

मराठवाड्यात भीषण दुष्काळ (Marathwada Drought)

राज्यात यंदा दुष्काळ पडला आहे…पावसाने अचानक दडी मारली आणि शेतातील उभी पिकं करपली (Marathwada Drought), माळरानं ओसाड पडली आणि नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली…शेतामध्ये माणसाला देखील प्यायला पाणी मिळत नाहीय…त्यामुळे प्राण्यांनी खायचं काय आणि प्यायचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय… हरीण, ससे, माकडं आणि इतर अनेक प्राण्यांना अन्न-पाण्याच्या शोधात मैलोन्‌मैल भटकावं लागत आहे… दिवसभर उन्हात फिरल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होतंय… प्रचंड तहान लागते… मात्र पाणी शोधूनही मिळालं नाही, तर हे प्राणी अशक्त होतात… त्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होतो… विशेषतः लहान पिल्लं आणि वृद्ध प्राण्यांसाठी ही परिस्थिती अधिक जीवघेणी ठरू शकते…

पक्ष्यांची परिस्थितीही काही वेगळी नाही… चिमण्या, कावळे, कबुतरं, मोर आणि इतर पक्ष्यांना पाण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडावं लागतंय… मात्र मोकळ्या माळरानावर पाणीच नसेल, तर त्यांनी जायचं कुठे? पाण्याच्या शोधात सतत उडत राहिल्यामुळे त्यांची ऊर्जा खर्च होते… त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं… पुरेसं पाणी आणि अन्न मिळालं नाही, तर पक्षी अशक्त होऊन खाली पडण्याचा आणि त्यांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो… काही भागांत प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याची माहिती आहे…

हेही वाचा : गोकुळ गाजवणारे सतेज पाटील किती श्रीमंत? महायुतीला कसं दिलं आव्हान?

बीड, जालना, धाराशिवमध्ये पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न

मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे… जंगलातील नैसर्गिक पाण्याचे पाणवठे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटले आहेत… ग्रामीण भागात विहिरींच्या तळाशी राहिलेल्या थोड्याफार गाळमिश्रित पाण्याचा शोध घेताना काही वन्यप्राणी विहिरीत कोसळून मृत्युमुखी पडत असल्याची माहिती आहे… हरणे, काळवीट, माकडे आणि रानडुक्कर यांसारखे जंगली प्राणी पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे धाव घेत असल्याची माहिती आहे….

मराठवाड्यातील अनेक भागांत आणखी एक मोठी समस्या म्हणजे झाडांची कमतरता… दाट जंगलांमध्ये प्राण्यांना झाडांच्या सावलीत विश्रांती घेता येते… मात्र मोकळ्या माळरानावर अशी सोय नसते… उन्हापासून वाचण्यासाठी प्राणी झाडांचा किंवा झुडपांचा आधार घेतात… पण झाडंच कमी असतील, तर त्यांना थेट उन्हाचा सामना करावा लागतो… जमिनीचं तापमान वाढतं… सावली नसल्याने शरीराला थंडावा मिळत नाही… त्यामुळे पाण्याची गरज आणखी वाढते… आणि नेमकं याच परिस्थितीत पाण्याची टंचाई निर्माण झाली, तर प्राणी-पक्ष्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो…

हेही वाचा : India-US Trade Agreement : भारत-अमेरिका व्यापार कराराला गती मिळणार? रुबियो यांच्या दौऱ्यात टॅरिफ, रशियन तेल

दुष्काळात मुक्या जीवांसाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या? (Wildlife Water Crisis)

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दुष्काळाची तीव्रता आणखी वाढली, तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते… अन्न-पाण्याच्या शोधात असणारे हजारो प्राणी पक्षी मृत्यूमुखी पडू शकतात….त्यामुळे सध्या वनविभागाला या प्राण्यासांठी आणि पक्षांसाठी अन्नपाण्याची सोय करण्याची गरज आहे….पण हे मॅनेज करणे अवघड जाणार आहे…कारण राज्य सरकारने अद्याप पाळीव जनावरांसाठी योग्य पद्धतीने चारा आणि पाणी उपलब्ध करून दिलेला नाही…छत्रपती संभाजीनगरमध्ये जनावरांसाठी टँकरने पाणी मागवावं लागत आहे…पण टँकरवाले एका टँकरसाठी तब्बल 1000 ते 1200 रूपये घेत आहेत…म्हणजे सध्या पाणी नसल्याने शेतकऱ्यांची लुट सुरू आहे…पहिलेच शेतकऱ्यांकडे एक रूपयाही नाही, त्यात जर एक टँकर 1200 रूपयाला विकत घ्यावं लागत असेल तर महिन्यामध्ये फक्त पाण्यासाठीच 5 ते 7 हजार रूपये खर्च करावे लागू शकतात…त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालाय…

म्हणजे जर सध्या पाळीव जनावरांचेच एवढे हाल पाहायला मिळत असेल तर जंगलातील जनावरांचं काय? राज्य सरकार या मुक्या जनावारांसाठी प्रत्येक ठिकाणी पाणी आणि अन्न तर उपलब्ध करून देऊ शकत नाही..त्यामुळे या भीषण दुष्काळामुळे अनेक मुक्या प्राण्यांचा आणि पक्षांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे…आता या दुष्काळात सरकार काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics, UI & UX.Education : Bachelor Of Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts