वानवडी, पुणे — देशासाठी दीर्घ सेवा दिल्यानंतर निवृत्त झालेले एक भारतीय वायुसेना अधिकारी आता स्वतःच्या घरातच सुरक्षित राहू शकले नाहीत.
पुण्यातील वानवडी परिसरात एका निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरट्यांनी तब्बल ६६ लाख रुपयांचे सोनं आणि रोकड लंपास केली.
५० तोळे सोनं आणि मोठी रोकड गायब
चोरांनी अधिकाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश मिळवला,
५० तोळे सोनं आणि लाखो रुपयांची रोकड चोरून नेली.
घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देण्यात आलं होतं,
चोरीची ही घटना दिवसा अथवा रात्रीच्या वेळेस घडली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास
वानवडी पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.
घराच्या शेजारील लोकांची चौकशी केली जात आहे.
चोरीची रचना पूर्वनियोजित होती का? घराच्या हालचाली कुणाला माहित होत्या का?, याचा सध्या तपास सुरू आहे.
देशासाठी लढले… पण घर सुरक्षित नाही!
या घटनेने निवृत्त सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
देशासाठी आयुष्यभर सेवा देणाऱ्या सैनिकाला स्वतःच्या घरातच चोरीचा फटका बसणं अत्यंत दुर्दैवी आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
या घटनेनंतर वानवडी परिसरात भितीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिक रहिवाशांनी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.