मुंबईसह राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. या वेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली तसेच तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या भागांमध्ये मदत व बचाव कार्य वेगाने करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.