अकोला जिल्ह्यात MPSC चा अभ्यास करणाऱ्या एका युवकावर अज्ञात व्यक्तींनी अॅसिड हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक आहे. जखमी तरुणाच्या मोठ्या भावाने या हल्ल्याच्या मागे त्याच्या रूम पार्टनरचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेचा प्रेमप्रकरणाशी संबंध आहे का, याचा देखील शोध घेत आहेत.