आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत खांदेपालट केला आहे. भाजपने आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली..