उच्च दर्जाच्या कंपनीचे सिमेंट बॅग कमी किंमतीत विकत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या सह पथकाने तात्काळ छापेमारी करून अवैध सिमेंट बनावटीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. अमरावती शहरात 31 जुलै च्या सायंकाळी अमरावती पोलीस आयुक्त यांच्या हद्दीतील तीन पोलीस स्टेशन हद्दीतील मासोद परिसर तर गाडगे नगर पोलीस स्टेशनं हद्दीतील नवसारी येथील गोडाऊन वर धडक कारवाई केली. सोबतच बडनेरा परिसरात सुद्धा काल बाह्य सिमेंट नवीन पद्धतीने तयार करून त्याला नामांकित सिमेंट कंपनीचे लेबल लावून विक्री केली जात असल्यामुळे धडक छापेमारी करण्यात आली.