पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार रामेश्वर आंधळे, पोलीस अंमलदार नितीन तायडे आणि महिला चालक पंचमावती भोजने हे सन्मानित अधिकारी आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.