इंडस वॉटर ट्रिटी भारताने रद्द केल्याच्या निर्णयावर पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असिम मुनिर यांनी संताप व्यक्त करत भारताला आणि मुकेश अंबानी यांना थेट धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले की, “भारताने जर जलाशय बांधला तर आम्ही १० क्षेपणास्त्रे मारून तो नष्ट करू.” मुनिर यांनी कुरआनातील संदर्भ देत भारताच्या आर्थिक केंद्रांवर थेट हल्ल्याचा इशारा दिला आणि म्हटले की, “आम्ही पूर्वेकडून सुरुवात करू आणि पश्चिमेकडे पुढे जाऊ.”