बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात आज चवथ्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असतानाही हजारो भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून भगवान नागनाथाच्या चरणी लीन झाले. आज श्रावणातील चवथा आणि अखेरचा सोमवार असल्याने भाविकांचा ओघ अधिक वाढला. भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये व दर्शन सुरळीत व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.