खोक्या ऊर्फ सतीश भोसले याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला याप्रकरणी अटक देखील करण्यात आली होती. सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य तसेच गांजा आढळून आला होता. शिरूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.