शहरात देशी दारूचे दुकान नकोय,यासाठी स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र प्रशासनाने डोळे बंद केल्याने अन्नत्याग करण्याचा पवित्रा शेतकरी संघटनेने घेतला आहे.चंद्रपूरातील कोरपणा शहरात देशी दारूचे दुकान उघडण्याचा तीनदा प्रयत्न झाला होता. आता मात्र नगरपंचायतेच्या मुख्याधिकारी यांना हाताशी धरून नव्या देशी दारू दुकानाला नियंबाह्य ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.