‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावरुन नव्या वादाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप हिंदू महासंघाने केला आहे. यावर हिंदू संघानं सेन्सॉर बोर्डाला पत्रही पाठवलं असून त्या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्यामध्ये अनेक जणांनी स्वतःची मतं नोंदवली असली तरी सेन्सॉर बोर्ड यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. हिंदू महासंघाने आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा आणि योग्य तो इतिहास दाखवा असे निर्मात्याला सांगितले. या चित्रपटामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.