गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी वाहतूक नियमांबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नियोमी साटम यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी सिंधुदुर्गात येतात. या प्रवासात कोणाचीही गैरसोय होऊ नये आणि प्रवास सुरक्षित राहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे