अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी अटक करत एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जीलू नायर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत बांगलादेशच्या गार्ड लाईन परिसरातून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या सुटकेस मधून आठ किलो गांजा मिळून आला. त्याने हा गांजा ओरिसा इथून आणला होता, हा कोणाला देणार होता याचा तपासाचा पोलीस करत आहेत.