बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत निलेश सोपान अडागळे (३४) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतातील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या निलेश यांना अचानक शॉक बसला. तात्काळ मदत करण्यात आली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. निलेश यांच्या आकस्मिक निधनाने कोऱ्हाळे बुद्रुक व बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.