बुलढाणा – शरद पवार यांच्या मंडल यात्रेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. “सत्ता गेल्याने काम नसलेले पवार आता निव्वळ नौटंकी करत आहेत. त्यांना ओबीसीबद्दल कुठलाही कळवळा नाही. उलट आम्ही ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत आहोत,” असे ते म्हणाले. पवारांची मंडल यात्रा ही फक्त राजकीय शोबाजी असल्याचा आरोप त्यांनी केला.