बीडच्या च-हाटा येथे मायलेकीसह तिघींवर चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून लोखंडी पाईप आणि रॉडने केल्या जाणाऱ्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. जागेच्या कारणावरून शिवीगाळ करत चार ते पाच जणांच्या टोळक्याने मायलेकीसह इतर तिघींवर लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघी जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.