बीड जिल्ह्यात मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्नावरून आंदोलन केले जात असताना प्रशासनाकडून जमाबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यातून एखादी अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हे आदेश काढण्यात आले आहेत.