मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी आंतरवली सराटीतून मुंबईकडे प्रवासाला निघणार असून शेकडो मराठा मावळे त्यांच्या सोबत रवाना होणार आहेत. “चलो मुंबई”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमलाय. बीड जिल्ह्यातील मावळ्यांनी मुंबईत मुक्कामासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केली असून काही ठिकाणी रिक्षांना रथ बनवून उत्साहात मोर्चाला रंग देण्यात आला आहे. मराठा बांधवांचा जोश आणि तयारी पाहून वातावरण उत्सवी बनले आहे.