बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावात अविनाश बापू दिवटे या तरुणाने घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उठताच आईच्या नजरेस लटकलेला मृतदेह पडताच हळहळ व्यक्त झाली. अविनाश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसून या घटनेने कुटुंब व गावात शोककळा पसरली आहे.