मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार हजेरी लावली. पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही असे भात पीक उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले होते. काही भागात पावसाने अल्प हजेरी लावल्याने भातपीक करपायला लागले होते. तर प्रचंड उखड्याने नागरिकही बेजार झाले होते. गणरायाच्या आगमनानंतर पावसाने लावलेल्या हजेरीन सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.