सलमान खान होस्ट करत असलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस 19’ 24 ऑगस्टपासून कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर सुरू होत आहे. या हंगामात गौतम खन्ना, अश्नूर कौर, बेसिर अली आणि अभिषेक बजाज असे काही प्रसिद्ध चेहरे दिसू शकतात. बिग बॉस नेहमीच वाद आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे. पण आणखी एक गोष्ट नेहमी चर्चेत असते ती म्हणजे स्पर्धकांना मिळणारे तगडे मानधन. या लेखात, आतापर्यंत बिग बॉसमध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या सेलिब्रिटींबद्दल माहिती दिली आहे. पण त्याआधी बिग बॉस 19 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वात महागड्या स्पर्धकावर नजर टाकूया. ज्याच्या नावाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.
बिग बॉसच्या 19 व्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धक म्हणून गौरव खन्नाच्या नावाची चर्चा आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या हंगामात त्याला सर्वाधिक मानधन दिले जात आहे. मात्र, त्याच्या मानधनाची रक्कम अजून जाहीर झालेली नाही