गडचिरोली जिल्ह्यात आष्टी ते मुलचेरा रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत लखन गोरडवार या 25 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. आष्टी ते मुलचेरा रस्त्यावरील रेंगेवाही पुलाजवळ दुचाकीची किलोमीटरच्या दगडाला जबर धडक बसली. त्यात एकाच जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून पुढील तपास सुरु आहे.