मालेगावमध्ये माजी मंत्री बळीराम हिरे यांचे पुत्र आणि भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते किरण मगरे यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून मारहाण आणि जातीय शिवीगाळ करण्यात आली, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर या घटनेची चौकशी सुरु केली असून मालेगावमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.