मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत दाखल होत असतानाच भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ शहरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली आहे. “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्व लक्षात ठेवतो” अशा आशयाची पोस्टर लावण्यात आली असून, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.