चिखली तालुक्यातील अंचरवाडी परिसरात काळवीटाची शिकार करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच बुलढाणा वन विभागाने धाड टाकून एक जिवंत काळवीट, चार चामडी, एक दुचाकी आणि शिकारीचे साहित्य जप्त केलेय. मात्र वन विभागाचे कर्मचारी दिसताच हे शिकारी फरार झाले. त्यानंतर पंचनामा करून साहित्य जप्त करण्यात आलेय..अज्ञात शिकाऱ्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.