झांसीच्या गरौठा भागात राखीच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. 18 वर्षीय कुमारी सहोदर उर्फ पुत्ती हिचा तिच्या सख्ख्या भावाने गळा आवळून खून केला. चंद्रपुरा गावातील दादा महाराज चबुतऱ्याजवळ तिचा मृतदेह सापडला, तिचे केसही कापलेले होते. पोलिसांनी पुत्तीचा भाऊ अरविंद आणि त्याचा मित्र प्रकाश प्रजापती यांना अटक केली. पुत्तीचा 19 वर्षीय प्रियकर विशाल याचा ७ ऑगस्टला संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन्ही हत्यांची एकमेकांशी सांगड असल्याचा पोलिसांना संशय आहे.