बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोलोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादानंतर न्यायालयाने शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा चतुर्सिमा ताबा लीलावधारकाला देण्याचा आदेश दिला. पोलीस बंदोबस्त असूनही मंडळ अधिकारी झिने यांच्या गलथान कारभारामुळे महसूल कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आणि नामुष्की सहन करावी लागली.