इंदापूर पोलिसांनी बुलेट राजांना मोठा दणका दिलाय. कर्कश्य आवाज करणाऱ्या 35 बुलेट दुचाकी वरती इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सर वर थेट इंदापूर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे. या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल 35 हजार रुपयांचा दंड देखील वसूल केलाय.