bank nomination rules change : ऑक्टोबर महिना संपण्यासाठी काही दिवस उरले आहेत. आता नोव्हेंबर महिन्यात बँकेचे नियम बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नियमानुसार आता बँक ग्राहक खात्यात नॉमिनी म्हणून चार लोक जोडू शकतील. जाणून घेऊया काय आहेत हे नियम.
एक नोव्हेंबर पासून बँक खात्याच्या नॉमिनीशी संबंधित असलेले नियम बदलणार आहेत. या नियमानुसार आता बँक ग्राहक त्यांच्या खात्यामध्ये एक नाही तर चार नॉमिनी जोडू शकतील. ही सुविधा नोव्हेंबर महिन्यापासून ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने गुरुवारी मोठी घोषणा केली.
तुम्ही जेव्हा बँकेत खाते सुरू करण्यासाठी फॉर्म भरतात. तेव्हा नॉमिनी ठेवण्याचा ऑप्शन तुम्हाला दिला जातो. तुम्ही नॉमिनी म्हणुन एकाच व्यक्तीचे नाव नोंदवण्याचा ऑप्शन तिथे असतो. परंतु आता तुमच्यासाठी एक नाही तर चार नॉमिनी ठेवण्याचा ऑप्शन उपलब्ध असणार आहे. बऱ्याचदा काही व्यक्तींच्या बँक खात्यात नॉमिनी जोडलेला नसतो. अशावेळी भारतातील रक्कम कुटुंबातील सदस्य पर्यंत पोहोचवण्यासाठी अडचणी येतात. आणि अनेक प्रकारचे कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळही लागतो. परंतु आता चार नामनिर्देशित व्यक्तींचा नियम आल्यानंतर या वादापासून संरक्षण मिळेल.
हे हि वाचा : नेपाळमध्ये भीषण अपघात; 700 फूट खोल दरीत जीप कोसळल्यानं 8 जणांचा मृत्यू
या नियमामुळे ठेवीदार आणि त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींसाठी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभरीत्या होईल. ठेवीधारकाच्या पसंतीनुसार एकत्र आणि वैकल्पिक रित्या नामनिर्देशित व्यक्तींची निवड केली जाऊ शकते. याशिवाय सुरक्षित ताब्यात ठेवलेल्या वस्तू आणि लॉकर साठी फक्त रोटेशनल नॉमिनीजसाठी परवानगी दिले जाऊ शकते. त्यानुसार पहिला नामनिर्देशित व्यक्तीच्या मृत्यूनंतरच पुढील उमेदवार सक्रिय होऊ शकतात.
हे नवीन नियम ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. त्यांना मालमत्तेची चिंता करावी लागणार नाही. एखाद्या ठेविदाराचा मृत्यू झाला तर त्याने निवडलेले नामनिर्देशित व्यक्तीला पैसे किंवा मालमत्ता सहज मिळू शकेल. यापूर्वी ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती परंतु आता नवीन नियमानुसार ही पद्धत सोपी झाली आहे









