गेल्या काही दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे. दिवाळी या सणाला बरेच जण सोने चांदी खरेदी करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे भाव प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. परंतु आज हे भाव स्थिर झाल्याचे पाहायला मिळाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे दर 2600 रुपयांनी घसरले आहे. तर चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे सोने चांदीच्या किंमतीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. परंतु खरेदीदारांसाठी हा आनंद किती दिवस राहणार हे सांगता येत नाही.
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एका तोळ्याचे दर 1 लाख 20023 रुपये होते. 8 ऑक्टोबरला सोन्याचे दर 1 लाख 23 हजार 677 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सोन्याचे दर 2600 रुपयांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे. तर चांदीचे दर 8 ऑक्टोबरला 1 लाख 53 हजार 388 रुपयांवर पोहोचले होते. आजचा चांदीचा एका किलोचा दर 1 लाख 49 हजार 115 रुपयांवर पोहोचलाय. म्हणजेच चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा दर 1 लाख 20 हजार 845 रुपयांवर होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 20 हजार 361 रुपयांवर पोहोचला आहे. 20 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 10 हजार 694 रुपयांवर पोहोचला. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 634 रुपये आहे.
प्रमुख शहरातील दर
भारताची राजधानी नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 22 हजार 440 रुपये प्रति तोळा आहे. हाच दर अहमदाबादमध्ये सोन्याचा दर 1 हजार 22 हजार 340 रुपये आहे. तर चेन्नईत 1 लाख 22 हजार 840 आणि पाटणा येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 22 हजार 340 रुपयांवर आहे.